घंटा वाजणार ! 12 तारखेला घंटा वाजणार…

11

गेल्या ८/९ महिन्यानंतर पुन्हा एकदा घंटा वाजणार आहे. होय नाट्यगृहाची घंटा येता 12 तारखेला वाजतांना ऐकायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नाटकं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे नाट्यग्रह बंद पडले होते. मात्र, येत्या १२, १३ डिसेंबर पासून मराठी रंगभूमीवरील नाटकं पुन्हा सुरू होत आहेत.

जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघातर्फे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्यानंतर अभिनेते प्रशांत दामले माध्यमांशी बोलत होते. आम्ही नाटक सादर करायला उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रसिकही नाटक बघायला उत्सुक असतील, त्यामुळे आम्ही नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत असल्याचं दामले यांनी माध्यमांना सांगितलं.

शासनाने जे नियम घालून दिले आहे त्या नियमांचे पालन करत हे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. अशी माहिती प्रसिद्ध मराठी अभिनेते दामले यांनी दिली. प्रेक्षकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. तुम्ही काळजी घ्या तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी आमची असं ते म्हणाले. सर्व प्रेक्षकांनी नाटक बघायला यावं अशी विनंती त्यांनी रसिकांना केली आहे.