पुजा चव्हान आत्महत्याप्रकरणी आवाज ऊठवल्यामुळे भाजपच्या “या” नेत्यास धमकीचे फोन

92

बीड जिल्ह्यातील परळी वै. येथील पुजा चव्हान
या तरुणीचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेते आहे. पुजा चव्हान आत्महत्याप्रकरणी व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीप्समधून महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याचे नाव समोर येते आहे. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शी चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून होते आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीसुद्धा याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. परिणामी पुजा चव्हान प्रकरणी आवाज ऊठवल्यामुळे कालपासून धमकीचे फोन येत असल्याचे अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत सांगीतले आहे. तसेच महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

“पुजा चव्हानच्या संशयित आत्महत्येप्रकरणी आवाज ऊठवल्यामुळे कालपासून धमकीचे फोन येत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात ही झुंडशाही बळावत आहे” असे भातखळकर म्हणाले. तसेच “अशा धमक्यांना मी बधणारा नाही, हे सरकार प्रयोजित गुंड‍ांनी लक्षात घ्यावे” असे ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीकेची झोड त्यांनी उडवली आहे.

पुजा चव्हान हीच्या आईवडिलांकडून याबाबत कुठलिही तक्रार दाखल केली गेलेली नाही. शिवाय पुजा चव्हान हीने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे तीच्या वडिलांकडून सांगण्यात येते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता चौकशीची मागणी केली आहे. तर भाजपा प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. दरम्यान अतुल भातखळकर यांनीसुद्धा याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतरच हे धमकीचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.