सध्या रेमडेसीव्हीर ईंजेक्शन हा चर्चेचा विषय ठरतो आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या ऊपचारासाठी रेमडेसीव्हीर ईंजेक्शनचा ऊपयोग होतो. परंतू अचानक रेमडेसीव्हीर ईंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही जणांकडून रेमडेसीव्हीरचा काळाबाजार होत असल्याची घटना समोर आली आहे. ईंजेक्शनचा साठा करुन चढ्या दराने विक्री करण्याचा प्रकार पुण्यात ऊघड झाला आहे. याप्रकरणी एका नर्सल अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेकडून नर्सची चौकशी केली जात आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये झापाट्याने वाढ होते आहे. ऊोचारादरम्यान रेमडेसीव्हीर ईंजेक्शनची आवश्यकता भासल्यास ते मिळत नाहीये. अशावेळी काही नातेवाईक चढ्या दराने गैरप्रकारे ईंजेक्शन मिळवत आहेत. पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकारावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर सापळा रचुन ही कारवाई करण्यात आली आहे.
पृथ्वीराज मुळीक(२२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पृथ्वीराजला याप्रकरणी एक नर्स साथ देत होती. संबंद्धित नर्स ही हिंजवडीतील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहे. सध्या या नर्सची चौकशी सुरु असून याप्रकरणात अजून कोण सहभागी आहे याची माहिती घेतली जात असल्याचे गुन्हे शाखेचे ऊपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी यावेळी सांगीतले.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात रेमडेसीव्हीरचा तुटवडा जाणवतो आहे. अनेक अौषध विक्रेत्यांकडूनसुद्धा रेमडेसीव्हीरवा अवैध साठा करुन चढ्या दराने विक्री केली जात आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून रेमडेसीव्हीर ईंजेक्शनच्या काळाबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती केली आहे.