मंगळवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैत्री सेतू’ पुलाचं उद्घाटन केलं.त्यानंतर ते म्हणाले की, मैत्री सेतू सुरु झाल्यामुळे अगरतला, अंतरराष्ट्रीय समुद्री बंदरगाहपासून सर्वात जवळील शहर झालं आहे. या पुलामुळे भारत आणि बांगलादेशमधील दळणवळण अधिक सुकर होणार आहे.
मैत्री सेतू’ या पुलासह मोदी यांनी मंगळवारी त्रिपुरामधील काही विकासकामांचे उद्घाटन केलं तसेच त्यांनी अनेक विकासकामाचं भूमिपूजनही करण्यात आलं.या पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना या ही या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फ्रन्सच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. तसेच त्रिपुरा हे भारताचं ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणून भरभराटीस येणार आहे.