वाढदिवसादिवशी अपार्टमेंच्या बाहेर गर्दी न करण्याचं भाईजानने दिलं चाहत्यांना आवाहन

11

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यंदा 27 डिसेंबर दिवशी 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येक वर्षी सलमान खानचे फॅन्स त्याच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर उभे राहून त्यांना पाहतात. पण यंदा सलमान खानने त्याच्या चाहत्यांना कोरोना परिस्थितीचे भान ठेवत आपल्या घराबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या घराबाहेर याबाबत फलक लावण्यात आला आहे. सलमान खान यंदा त्याचा बड्डे अत्यंत साध्या पध्दतीने कोरोनाचे नियम पाळून साजरा करणार आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्या 55 व्या वाढदिवसानिमित्त सलमान त्याच्या ‘राधे’ सिनेमाची डेट जाहीर करू शकतील असा अंदाज आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सलमान खानने कामाला सुरूवात केली आहे. सुरूवातीला राधे सिनेमाचं उरलेलं चित्रीकरण पूर्ण केले, आता बिग बॉसचं सूत्रसंचालन आणि त्यानंतर आता अंतिमचं शूटिंग सुरू आहे. दरवर्षी सेलेब्रिटी पार्टी आणि चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करणारे भाईजान यावर्षी कोरोनामुळे वाढदिवस साजरा करणार नाहीत.