कॅब चालकाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केला तरुणीवर बलात्कार

17

आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीला ओला कॅब मध्ये गुंगी येणारे औषध पाण्यात टाकून पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आला आहे. संबंधित तरुणीचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे.

याप्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीनुसार सदरील कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धायरी परिसरातील लॉजवर ४ ते ३० मार्च दरम्यान घडली आहे.

सदर घटनेत तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली. त्या कॅबमध्ये जात असताना तिला तहान लागली. कॅबचालकाने पाणी दिले. त्या पाण्यात गुंगी येणारे औषध मिसळलेले होते. ते पिल्याने तरुणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने त्या तरुणीला लॉजवर नेऊन अश्लिल फोटो काढले.