अमिताभ यांच्या आवाजातील कॉलर ट्यून होणार बंद, आता नवीन कॉलर ट्यून ‘या’ सुपरस्टार च्या आवाजात

66

दोन गज दुरी मास्क है जरुरी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आपल्या मोबाईल वर ऐकू येणारी ही कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. हो हे खरं आहे. कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील डिफॉल्ट कॉलर ट्यून लावण्याचे आदेश, संबंध टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले होते. गेली 6 महिन्यांपासून आपण कोणाला फोन लावला की अमिताभ बच्चन यांचा आवाज आपल्याला ऐकू येत असे.

पण आता भारत सरकारने ही डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीच्या संबंधित जनजागृती करण्यासाठी नवीन कॉलर ट्यून तयार करण्यात आली आहे. ही कॉलर ट्यून जरी कोरोना संदर्भात असली तरी मातृ यातील आवाज अमिताभ बच्चन यांची नसणार आहे. आज पासून आपण कोणालाही फोन केला तर आपल्याला आपल्या मोबाईल फोन वर एक नवीन कॉलर ट्यून ऐकायला येईल. या नवीन कॉलर ट्यून मधील आवाज असेल जसलीन भल्ला यांचा.

कोण आहेत जसलीन भल्ला ?

जसलीन भल्ला या सुप्रसिद्ध व्हॉइस ओव्हर कलाकार आहेत. त्यांनी यापूर्वी पहिल्या कोरोना संबंधित कॉलर ट्यून ला सुद्धा आवाज दिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. आज आपण दिल्ली मेट्रो, रेल्वे, स्पाईस जेट, आणि इंडिगो विमानात सुद्धा त्यांचाच आवाज ऐकतो. त्या आधी क्रीडा पत्रकार होत्या. नामांकित साप्ताहिकात त्यांनी काम केलं आहे.

म्हणून बदलावा लागला अमिताभ यांचा आवाज

कोरोना बाबत अमिताभ यांच्या आवाजातील कॉलर ट्यून चालवली जात होती, तेव्हा वेळ वेगळी होती. पण आता देश लसीकरणाच्या वाटेवर असताना , लसी बाबत जनजागृती व्हावी म्हणून नवीन ट्यून बनवण्यात आली आहे आणि पर्यायाने अमिताभ यांची जुनी ट्यून बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून ही ट्यून वादाच्या भोवऱ्यात सापसदली होती. दिल्ली उच्च न्यायालयात या ट्यून विरोधात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. या कारणामुळे बंद करण्यात आल्याचे काही नेटकरी बोलत आहेत. नवीन डिफॉल्ट कॉलर ट्यून मध्ये कोरोना लसी बाबत माहिती आणि जनजागृती करण्यात येईल. ही ट्यून 30 सेकंदाची असेल.