मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये एका इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर २१ जानेवारी रोजी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशामुळे लागली याबाबत अनेक तर्क वितर्क निघत होते. या आगीचा पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास करण्यात येणार होता.
पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या आणि कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत असलेल्या सीरम इंस्टि्टयूट ऑफ इंडिया मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास पूर्ण झाला असून शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सिरम इन्स्टिट्युटला ज्या दिवशी आग लागल्याची घटना घडली. त्याचदिवशी मी घटनास्थळी भेट दिली होती. मात्र, ही शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली आहे. त्यामागे दुसरे काही कारण नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले होते. सीरमच्या पुण्यातील प्लँटमध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोव्हीशील्ड व्हॅक्सीन तयार केली जात आहे. परंतु, या दुर्घटनेत कोरोना व्हॅक्सिनचे नुकसान झाले नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते.