‘कोविड परिस्थिती हाताळण्यात केंद्र अपयशी; केंद्र सरकार हतबल झालय’

21

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना कोविडची हि स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र तयार झाले असून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकण्याचे काम होत आहे. मात्र केंद्र सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा निश्चित झाल्यानंतरही राज्याला ऑक्सिजन देत नाहीत. महाराष्ट्राच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकमधील भिलाई येथून येत होता तो राज्याला मिळत नाही, रेमडेसिवीरचा साठा वेळेत वितरित होत नाही, तसेच लसीकरणाचा कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाला आहे.

राज्यात पहिली लस घेतलेले साडेचार लाखाहून अधिक लोक आहेत त्यांच्या दुसरा लसीचा डोस घेण्याची तारीख निघून गेली तरीही लस मिळालेली नाही अशी खंत मलिक यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस मिळत नाहीत.

मोदी सरकार केवळ भाषण करणे, घोषणा करणे आणि वेळ काढूपणा करत आहे. अशी शंका मलिक यांनी व्यक्त केली. तसेच लवकर लस द्या, ऑक्सिजनचा कोटा कपात करू नये आणि रेमडेसिवीरचा साठा योग्य साठा मिळावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केंद्राकडे केली आहे.