दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी केंद्र सरकार मोठी कारवाई

15

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्याप्रमाणात हिंसा झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात ऊमटले. घडलेल्या घटनेवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोदेखील झाले. मात्र, हिंसा करणार्‍यांविरुद्धा सक्त कारवाईचे पाउल सरकारने नुकतेच ऊचलले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट आणि सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने ही कारवाई करण्यात आली. चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणार्‍यांच्या ट्वीटरवर ट्वीटरने बंदी घातली आहे.

या कारवाईमध्ये ३०० हून अधिक अकाऊंट डिलीट केल्याचे ट्वीटरने म्हटले आहे. कारवाई करण्यात आलेल्या हॅंण्डलपैकी “द कारवा” आणि “किसान एकता मोर्चा” यांचे नाव पुढे आले आहे. यामध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांचे अकाऊंट्सचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलिस गंभीर जखमी झाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. हिंसाचाराला समर्थन करणार्‍यांची गय केली जाणार नाही असा निर्वाणीचा ईशार सरकारने या कारवाईतून दिला आहे.