मुंबई पोलिस सक्षमपणे तपास करत असताना एनआयएकडे तपास देणे हे पोलिसांच्या कर्तव्यावर हल्ला आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
वाझे यांनी या सगळ्यांचा प्रिय असलेल्या टीव्ही अँकरला आत टाकले होते. टीआरपी घोटाळ्याचा तपास केला होता. त्यामुळेच एनआयएच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्याचा डाव आहे, असा आराोपही त्यांनी केला.
सुशांत सिंग प्रकरणातही विरोधी पक्षाने आरडाओरड केला. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब केले. त्या प्रकरणात सीबीआयने काय केले हे विरोधी पक्षाने सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
मुंबई पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकाने मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास केला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील घटनांचा तपास केला आहे. आरोपींना फासापर्यंत चढविले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकरवी केंद्र सरकार राज्यांवर दबाव आणत आहे.असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.