राजपथावरील संचलनात ‘ह्या’ राज्याचा चित्ररथ प्रथम; राम मंदिराने पटकावला क्रमांक

13

प्रजासत्ताक दिनी राजपथावर देशाच्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदश आणि काही मंत्रालयाचे चित्ररथ संचालन करतात. यावर्षीच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिर प्रतिकृती असलेल्या सदरील चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे.

ह्या चित्ररथ संचालन करत असताना उपस्थित जनतेने जोरदार प्रतिसाद देऊन या चित्ररथाचे स्वागत केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या चित्ररथ प्रथम ठरला आहे. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांच्याकडून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाला प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला. सर्व चमूला हृदयापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार’ असं ट्विट शिशिर यांनी केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात गेले अनेक दशकांचा राम मंदिराचा प्रश्न सोडवला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशने राम मंदिराची प्रतिकृती यासह महर्षी वाल्मिकी यांची रामायण लिहितानाची प्रतिकृती चित्ररथावर साकारण्यात आली. आणि उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक मिळाला आहे.