केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली, त्यावरून शिवसेना-भाजपा यांच्यात पुन्हा झुपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
भाजप नेते नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत जिथे सत्ता तिथे ते. हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि शहांवर जहरी टीका केल्या आहेत. तसेच अमित शहांचे विधान यावर्षीचं सर्वात विनोदी आणि हास्यंस्पद आहे, शिवसेनेला आव्हान देणारे स्वत:चं संपले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला आणि अमित शहांना लगावला आहे.
तसेच नारायण राणेंच्या बाजुला बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं होतं की राणेंबाबत सभागृहात काय म्हटलं होतं?, नारायण राणेंनी भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांनी राणे कसे गुंड आहेत हे सांगितंल होतं. त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसलं असल्याचं म्हणत सावंत यांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.