जळगाव महिला वसतिगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर अाहे – अनिल देशमुख

14




जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृह कालपासून अचानकच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलव होते. येथील महिलांना काही पोलिस कर्माचारी आणि पुरुषांनी कपडे काढून नाचायला लावले असल्याचा प्रकार घडल्याची बातमी समोर आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा यावरुन गदरोळ झाला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विरोधकांनी ताशेरे अोढले होते. मात्र अनिल देशमुख यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन जळगावमधील त्या प्रकरणाचे तथ्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवले आहे.

संबंद्धित तक्रारदार महिला ही मनोरुग्ण असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. रत्नमाला सोनार असे या महिलेचव नाव असून पोलिसांत याअगोदरसुद्धा तीच्या वेडसरपणाबाबतच्या तक्रारी दाखल आहे. असे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगीतले आहे. ज्या दिवशी प्रकरण घडल्याचा ऊल्लेख सदर घटनेते करण्यात आला त्यादिवशी मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन त्याठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये नाच-गाणे वगैरेचेसुद्धा प्रकार झाले. दरम्यानचा एक व्हिडिअो व्हायरल करण्यात आला आहे आणि गैरसमज पसरवला गेला आहे. त्यादिवशी तिथे कुणीही पुरुष नव्हते हे चौकशीतून समोर आले आहे. असेसुद्धा अनिल देशमुख म्हणाले.

जळगाव महिला वसतिगृहाचे प्रकरण समोर येताच जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ चौकशीस सुरुवात केली. यामध्ये सहा वरिष्ठ महिला अधिकार्‍यांची समिती नेमण्यात आली. या समितीने घटनास्थळी जाऊन सगळ्यांचे जवाब नोंदवून घेतले आणि त्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये तक्रारदार महिला मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान काही माध्यम प्रतिनिधींनी वसतिगृहातील परिसरात भेट देऊन शेजार्‍यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यात भिन्नता अाढळून आली आहे. कुणी या वसतिगृहात अनुचित प्रकार घडतात असे सांगीतले तर कुणी याठिकाणी असा कुठलाही प्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही, असे मत मांडले.