पंतप्रधानांच्या घरी नेली काँग्रेसने शेतकऱ्यांच्या शेतातली माती

15

शेतकरी आंदोलनाचे 101 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 101 खेड्यांनी 100 कलश घेऊन पंतप्रधान निवासस्थानपर्यंत कलश मोर्चा काढण्याचा प्रयत्न किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

101 कलशात विविध राज्यातील माती वाहून नेण्यामागे 2014 च्या पंतप्रधानांना आठवण करून दिली पाहिजे हा उद्देश होता. पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीत ज्यात त्यांनी देशाच्या मातीबद्दल इच्छा दाखविली होती असे किसान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोलंकी यावेळी म्हणाले.

यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले असता परिसरात कलम १४४ च्या अंमलबजावणीमुळे किसान कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊ दिले जाणार नाही, असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले.

सिंधु बॉर्डर, गाजीपूर बॉर्डर आणि तिहेरी बॉर्डर वरती शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने तात्काळ तीनही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.सरकारच्या तोंडावरील माशी उडत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने तात्काळ तीनही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहे. जोपर्यंत कृषी कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असे स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.