शेतकरी आंदोलनावरुन ट्वीटर वॉर रंगला होता. परदेशी सेलीब्रिटींनी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते, तर भारतातील सेलीब्रीटींनी त्यांस प्रत्युत्तर देत #indiatogether या हॅशटॅगअंतर्गत ट्वीट केले होते. भारतीय सेलीब्रीटींनी केलेल्या ट्वीटमध्ये साधर्म्य अाढळते. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार सेलीब्रीटींवर दबाव आणून त्यांना हे ट्वीट करण्यास भाग पाडत असणार अशी शंका महाराष्ट्र कॉंग्रेसने व्यक्त केली होती. तसेच चौकशीची मागणीसुद्धा केली होती. अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान प्राथमिक चौकशीमध्ये भाजप आयटी सेलच्या १२ हस्तकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्या १२ जणांवर कारवाईची मागणी करत भाजपवर टीका केली आहे.
अनिल देशमुख यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. भाजप आयटी सेलच्या १२ हस्तकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. संबंद्धित १२ व्यक्तींचे नावे घेण्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी टाळले. महाराष्ट्र पोलुसांनी ही माहिती दिली आहे. पुढील तपास सुरु आहे. असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
सचिन सावंत यांनीसुद्धा ट्वीट करत आमची शंका खरी ठरल्याचे म्हटले आहे. “आम्ही चौकशीची मागणी केल्यानंतरसुद्धा एकही सेलीब्रीटीने पुढे येऊन सांगीतले नाही की, संबंद्धित मत हे आमचे वैयक्तीक मत होते. आमची मागणी सत्य ठरली आहे. संबंद्धित १२ व्यक्तींवर कारवाई करण्यात याव.” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले अाहे.
दरम्यान सचिन सावंत यांनी याप्रकरणावरुन भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. “सध्या टुलकीट हे नविन प्रकरण देशात सुरु आहे. मात्र भाजप टुलकीट हे आपल्या देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. लोकशाहीला बाधा पोहचवणारं आहे. आम्ही चौकशीची मागणी केली असता, भाजपच्या याच आयटी सेल आणि काही नेत्यांनी भारतरत्नांचा अपमान करत आहे अशी उलट आमचीच बदनामी केली. परंतू सत्य आता समोर आले आहे. सध्या देशात साध्या प्रकरणांमध्येसुद्धा देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र अॉफीशीअल सीक्रेट एक्टच्या कलम ५ चे ऊल्लंघन करणार्या अर्णब गोस्वामीवर कारवाई का होत नाही. बालाकोट एअर स्ट्राईची माहिती अगोदरच अर्णबकडे होती हे भाजपाच्यादृष्टीने गंभीर नाही का?” असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला. एका खाजगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.