चिंताजनक:बारामतीची कोरोना टक्केवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक

4

आज बारामतीची टक्केवारी पन्नास टक्क्यांहून पुढे गेल्याने स्थिती गंभीर बनत चालली असल्याचेच हे निदर्शक आहे. आज पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झालेला बघायला मिळाला.

काल (ता. 3) एकाच दिवशी बारामतीच्या महिला शासकीय रुग्णालयात 901 जणांचे लसीकरण करण्यात आले. कालपर्यंत महिला रुग्णालयात 15191 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. बारामती तालुक्यातील 18 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल.

बारामती तालुक्यातील 18 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी या बाबत माहिती दिली.