भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा 136 वा स्थापना दिवस चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला.यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर नागरिकांना लाडूचे वितरण करण्यात आले. कॉंग्रेसने निर्माण केलेली संपत्ती कवडीमोल भावात खासगी कंपन्यांना विकली जात आहे. पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. देशाला विकासाकडे नेण्यासाठी कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले
तसेच देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे.असे ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या 136 व्या स्थापना दिवस समारोहात बोलत होते.शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तिवारी यांच्या पुढाकारातून सेल्फी विथ तिरंगा या अभियान राबविण्यात आले. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर यांनी स्वतः: सेल्फी काढून अभियानाचा प्रारंभ केला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीसुद्धा सेल्फी काढली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशाचा विकास घडविण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, माजी आमदार देवराव भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे आदी मान्यवर उपस्थित होते.