105 दिवसांनतर पुन्हा एकदा निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव अजून वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाले असल्याची माहिती मिळत आहे. मागील अडीच महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी होती. यानंतर पुन्हा 1 जानेवारीपासून ही निर्यातबंदी उठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे.
सरकारच्या निर्णयाचा परिणाम लालसलगाव येथील बाजारसमितीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. लासलगावमध्ये कांद्याचा भाव सध्या 360 रुपयांनी वाढला आहे. अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. परंतु सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लासलगावमध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल 2372 रुपये असून किमान भाव 1000 रुपये आहे. तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे 2100 रुपये ईतका आहे.
कांदा उत्पादकांच्या विविध संघटना, राजकीय संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर तीन महिन्यांनी केंद्राने निर्यातबंदी उठवली गेली आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी धोरणात बदल केला. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा देशातील कांदा निर्यात करता येणार आहे.