नविन वर्षाच्या स्वगातासाठी लोकांची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टचं स्वागत करत असताना राज्य सरकारने नवीन 9 नियम आणि अटी लागू केल्या आहेत. राज्यात दि. 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
कोविड -19 संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे सरकारला अपेक्षित आहे. यामुळे थर्टी फर्क्टचे सेलीब्रेशन हॉटेल, रेस्टॉरंटऐवजी यावर्षी घरीच करावे लागणार आहे. कारण हॉटेल, बार हे रात्री साडे दहा वाजता बंद करावे लागत आहेत. यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर परिणाम होत असल्याचेही हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी सांगितले आहे.
यावर्षी थर्टीफर्स्टचा कोणताही जल्लोष नाही. त्यामुळे एकही बुकींग झालेली नाही. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम जाणवत असल्याचेही मनगटे यांनी सांगितले आहे. औरंगाबादमधील शहर व जिल्ह्यातील हॉटेल,धाब्यांची तापसणी आणि कारवाई करण्यात येणार आहे. यंदाही भरारी पथक कारवाईसाठी सज्ज असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी सांगितले.