अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु होण्याची तारीख लांबली

92

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अमरावती जिल्ह्यातील महाविद्याले सुरु करण्याची तारीख पुढे ढकलण्यात येत असल्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दिवसागणिक वाढतो आहे. त्यअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. २८ फेबृवारीनंतर महाविद्यालय सुरु करण्यासंबंद्धिच्या सुचना देण्यात येतील असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी विद्यापिठास दिले आहे.

महाराष्ट्रातील महाविद्यालये येत्या १५ फेबृवारीपासून ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय ऊच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र गत काही दिवसांतील अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता तारीख पुढे ढकलण्याची मागणी होत होती. अश‍ांतच ऊच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने यासंबंद्धी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याच्या सूचनाही विद्यापीठांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमिवरवच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाच्या अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम येथील जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली होती.

यावर अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर बघता पुढील दोन आठवडे महाविद्यालये सुरु न करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विद्यापिठास दिल्या आहे. अन्य चार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचे अभिप्राय विद्यापीठाला प्राप्त झालेले नाही. त्यांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर तेथील निर्णय घेण्यात येईल, असे कुलसचिव तुषार देशमुख यांनी सांगितले. सध्या अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये 28 फेब्रुवारी नंतरच सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

अमरावतीत काही दिवसांपासून अचानक कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परिणामी प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मास्क, सॅनीटायझर आणि फीजीकल डिस्टन्स या त्रीसुत्रीचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन अमरावती प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 3 फेबृवारीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ जाणवली होती. गेल्या २४ तासात ३१५ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील चार