वीज कनेक्शन खंडीत करण्याचा निर्णय म्हणजे सरकारची नवी गाथा: भाजपच्या ‘या’ नेत्याची सरकारवर टीका

12

राज्यात डिसेंबर २०२० अखेर महावितरणची एकूण ६३ हजार ७० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असं ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक चारोळी शेअर करत ही नवी गाथा असल्याचं म्हटलंय. मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली, अशी टीकाही उपाध्ये यांनी केलीय.

थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे, असं महावितरणने जाहीर केलं आहे.त्यावर वीज कनेक्शन खंडीत करण्याचा निर्णय म्हणजे सरकारची नवी गाथा असल्याचं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.