ममता बॅनर्जींमुळे बंगालची अधोगती

11

विकासात्मक दृष्टीचा अभाव असल्यामुळे ममता बॅनर्जी पच्छिम बंगलाचा विकास करु शकल्या नाहीत. ममता दिदिंच्या चुकीच्या राजकीय धोरणांमुळे ईतर राज्यांच्या तुलनेत पच्छिम बंगाल मागे आहे. ममता बॅनर्जींमुळेच या राज्याची अधोगती झाली आहे असा आरोप केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उडविली. हावडा येथील व्हर्च्युअर रॅलीला ते संबोधीत करीत होते.

आयुष्मान भारत योजनेपासून ममता दिदींनी प.बंगालवासियांना कोसो दुर ठेवले. ही योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरु केली या तीरकस राजकीय भुमिकेमुळे त्यांनी प.बंगालमधील लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवले. भारतीय जनता पक्षाचे सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव आणून पश्चिम बंगालमधील जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिले.

मध्यंतरी ममता बॅनर्जी यांनी आमच्याकडे एक कागद पाठवला होता. त्यात पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना लागू करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून काही फायदा नाही. बंगाली जनतेला मुर्ख बनवण्याचे काम ममता बॅनर्जी करत आहेत. केवळ एका कागदाने काही होत नाही. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी पाठवावी लागते. बँक खात्यांचा तपशील द्यावा लागतो. यापैकी त्यांनी. काहीच पाठवले नाही, असा दावा शाह यांनी केला. 

ममता बॅनर्जी प.बंगालमधील घुसखोरांना अप्रत्यक्षरित्या मदत करतात. या घुसखोरांना ममता दिदींची फुस आहे. असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच ममता दिदींच्या एकाधिकारी धोरणांमुळे त्यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहे. तृणमुल कॉंग्रेसमध्ये त्यांचे राजकीय भविष्य स्थिर नाही याची जाण त्यांना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर अनेक बडे नेते तृणमुलला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करीत आहे. भाजपाच प.बंगलाचे भविष्य ऊज्वल करु शकते असा दावादेखील शाह यांनी यावेळी केला.