सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे स्वीट होमधील खाद्यपदार्थांची विक्री कमी झाली आहे. स्वीटमार्टमध्ये तयार करण्यात येणारी मिठाई आणि इतर पदार्थ हे काही दिवसच टिकू शकतात.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडण्यास प्राधान्य देत होते. तर नोकरदार वर्गाला कामावरून सायंकाळी घरी जाताना मिठाई किंवा फरसान खरेदी करणे अधिक सोयीचे होते.
गेल्या वर्षी बंद झालेले ग्राहक आता कुठे गेल्या दोन महिन्यांपासून दुकानात दिसू लागले. त्यात सर्वाधिक जास्त ग्राहकांची संख्या सायंकाळीच असते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडण्यास प्राधान्य देत होते.