शिक्षण खाते लवकरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेणार

10

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात शिक्षण खाते शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येते. मात्र यावेळी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सर्वेक्षणास विलंब झाला आहे. मात्र शिक्षनापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खत्या लवकरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेणार आहे. यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे.

सर्वेक्षण योग्य प्रकारे व्हावे यासाठी शाळा सुधारणा कमिटी, ग्रामस्थ, जिल्हा पंचायत, महिला व बाल कल्याण खाते, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. सर्वेक्षण कधी सुरू करावे याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

१ ते १६ वयोगटातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये यासाठी शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह आहार, दूध आदींचे वाटप केले जाणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे, सर्वेक्षणानंतर एसएटीएस सॉफ्टवेअरमध्ये शिक्षकांना माहिती अपलोड करावी लागणार आहे.