मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परंतू कार्यक्रमासाठी मनसेच्यावतीने मागण्यात आलेल्या परवानगीस पोलिसांनी नकार दिला आहे. परिणामी मनसे स्टाईलनेच मनसेने याचा निषेध नोंदवला आहे. तसेच यावरुन आक्रमक भूमिकासुद्धा घेतली आहे.
“जी कारवाई करायची ती कारवाई करुन घ्या” असे आव्हानच मनसेने प्रशासनाल दिले आहे. “मराठी माणसाच्या मतांवर निवडुन येणारं हे सरकार जर मराठी दिनाच्या कार्यक्रमांनाचा नाकारत असेन तर धन्य आहे हे सरकार. मराठी दिनाचा कार्यक्रम होणारच जी कारवाई करायची ती खुशाल करु शकता” अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी यावेळी दिली.
कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात २७ फेबृवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसेच्यावतीने मराठी दिनानिमीत्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदा खुद्द राज ठाकरे यांनी “मराठी स्वाक्षरी मोहीमेचं” आवाहन केलं अाहे. राज ठाकरे यांनी तमाम मराठी भाषिकांना एक जाहीर पत्र लिहीले आहे. ज्यामध्ये मराठी स्वाक्षरी मोहीमेचा ऊल्लेख त्यांनी केला आहे. “आपली स्वाक्षरी ही आपली अोळख असते. मनसेच्या शाखांशाखांमध्ये फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी दिनाचे अौचित्य साधून त्या फलकावर जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि तेव्हाच मराठी अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा घ्या” असे ते पत्रात म्हणाले अाहेत. मनसेच्या अधिकृत फेसबुक पानावर हे पत्र प्रसारीत करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/486162474808958/posts/3752440744847765/
मुंबईतील शिवाजी पार्क याठिकाणी या कात्यक्रमाच्या आयोजनासाठीच मनसेकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करुन कार्यक्रम घेणार होतो. मात्र तरिसुद्धा आम्हाला परवानगी नाकारली आहे. परंतू आमचा कार्यक्रम होणारच, आम्ही कारवाईस सामोरे जायला तयार आहोत. परंतू याठिकाणी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचे दर्शन होते. नियम मोडणार्या त्यांच्याच सहकार्यांना वेगळा न्याय आणि नियमांत राहणार्यांना वेगळा असा हा प्रकार अाहे. अश्या तीव्र प्रतिक्रीया मनसेकडून येत अाहे.