प्रथम ‘या’ 13 शहरांमध्ये होणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस वाटप

7

जगभरात कोरोनाच्या संकटाने जनता त्रासलेली  असतांनाच ‘कोरोना’वर भारतातील पहिल्या वहिल्या ‘कोविशिल्ड’  लसीचे डोस वाटप आजपासून सुरू झाले आहेत. सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे ३ कोल्ड स्टोरेज कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आहेत. काल सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे डोस भरल्यानंतर हार व नारळ फोडून पूजा करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आज देशात एकूण 13 ठिकाणी ८ विविध विमानांमधून कोविशिल्ड लसीची वाहतूक केली जाणार आहे. पहिले विमान सकाळी दिल्लीकडे रवाना झाले आहे. आता १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी तीन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची विमान सज्ज झाली आहेत. एका गाडीमध्ये २३ बॉक्स बसतात. एका बॉक्स मध्ये १२०० लसीचे क्युब्ज आहेत. १२ हजार लोकांना ही लस देण्यात येणार आहेत. अशा तीन गाड्या आज रवाना झाल्या आहेत. आत्ता त्या अहमदाबादला पाठवत आहेत.

आज एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.