देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सगळा देश त्रस्त झाला आहे. कोरोनामुळं मृतांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन, बेड्स कमतरतेमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
या अडचणीच्या काळातही काही नेतेमंडळी प्रसिद्धीसाठी मागे हटण्यास तयार असल्याचं पाहायला मिळत आहे. माणसं मृत्यूच्या खाईत लोटले गेले असताना दुसरीकडे भाजपा नेते स्वत:ची लोकप्रियता वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.
गुजरातमधील अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सवालं कोविड सेंटर उभारलं. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात.
भाजप माजी आमदार सोलंकी यांनी ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक या प्रकाराचा निषेध करत आहेत. संकटकाळी स्वतःची प्रसिद्धी करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच्या प्रतिक्रिया सोशल साईटवर मिळत आहेत.