बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री आणि साधनसामग्री खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी (ता.24) 84 कोटी 86 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
सदरची यंत्रसामग्रीची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने करण्याचे निर्देश यात आहेत. प्रत्येक विभागाला लागणा-या सर्व बाबींची सखोल यादी या अध्यादेशात नमूद करण्यात आली आहे .
बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.बारामती एमआयडीसीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज गतवर्षापासूनच सुरु झाले असून रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे.