लॉकडाऊन आणि निर्बंध टाकण्याचा प्रयत्न करत जसं कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको. तसाच अधिवेशनाबाबत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे .
अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, असा आरोप करत दरेकर यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे .
कोरोनामुळे राज्य सरकारने नागपूरचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं होतं. त्याचा कालावधीही कमी केला होता. तेव्हाही भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे आहेत. त्याबाबत समाजातील प्रत्येक घटकांत असंतोष आहे. तो असंतोष आंदोलन आणि मोर्चाच्या रुपातून बाहेर येत, असल्याचा दावाही दरेकर यांनी केला आहे .