पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळातील एका धावत्या दौऱ्यात त्या राज्यातील उद्योग व पर्यटनाशी संबंधीत काहीं प्रकल्पांचे उद्घाटन केले. विलींग्टन आयलंड मधील रोरो सेवेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले तर कोचीन पोर्ट ट्रस्टच्या इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यावेळी बोलताना श्रीलंकेतील तामिळींच्या हितासाठी भारत सरकारने कायमच श्रीलंका सरकारकडे पाठपुरावा केला असून तेथील तामिळी नागरीकांना भारताने कायमच समर्थन दिले आहे आणि ते यापुढेही कायमच राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
प्रकल्पांमुळे केरळचा तर विकास होईलच पण देशाच्या विकासालाही त्यातून चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोरो सेवेमुळे नॅशनल वॉटरवेज मधून वाहने आणि प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणत नेआण केली जाणार असल्याने त्यातूनही नागरीकांची मोठी सोय होईल असे ते म्हणाले.
स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेला अर्जून रणगाडा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराकडे सुपुर्त केला. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चेन्नाई येथे झालेल्या एका कार्यक्रमात या रणगाड्याचा स्वीकार केला.