कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावावेत : गिरीष बापट

12

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावावेत. परंतु संपूर्ण लॉकडाउनची गरज नाही, अन्यथा अर्थचक्र उलटे फिरेल, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

राज्य सरकार पुण्यावर अन्याय करीत असून, महापालिकेला कोणतेही सहकार्य करीत नाही. सरकारने जम्बो कोविड सेंटरसाठी काही योगदान दिलेले नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने पुणेकरांच्या हाल अपेष्टा पाहत बसू नये.

खासदार बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत सोमवारी रात्री चर्चा केली. 

रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. परंतु अधिक आरोग्य विभागाने अधिक चांगली सेवा देण्याची गरज आहे. राज्य सरकारकडून ज्या प्रमाणात मदत दिली पाहिजे ती मिळत नाही, असे शहराध्यक्षांचे मत आहे, असे सांगत शहराध्यक्ष मुळीक यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबत सारवासारव केली.