आरक्षणाबाबत केलेल्या मागण्यांसाठी आता शासनाने ठोस निर्णय घ्यावेत  : खासदार संभाजीराजेंची विनंती

7

खासदार संभाजीराजे छत्रपती  यांनी मराठा समाजाला आंदोलन न करण्याचे आवाहन केले. शांत आणि सयंमी राहून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर न्यायमूर्ती भोसले समितीने आज सादर केलेल्या अहवालातही आम्ही केलेल्या मागण्यांचीच शिफारस शासनाकडे केली आहे.

आज त्यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी आरक्षणाबाबत केलेल्या मागण्यांसाठी आता शासनाने ठोस निर्णय घ्यावेत अशी विनंती केली आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजे यांनी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांचीही भेट घेतली आहे.