सरकारचा फ्यूजच उडाला आहे, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल: चित्रा वाघ

19

कोरोना काळात अनेकांना ५० हजारांपेक्षा जास्त वीजबिले आली आहेत. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. यांचा खोटारेडपणा आता जनतेपुढे उघड झाला आहे. या सरकारचा फ्यूजच उडाला आहे, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, त्या म्हणाल्या जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जनता सरकारला योग्य धडा शिकवेल. त्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याणमधील आडिवली -ढोकळी हळदी कुंकू कार्यक्रमात बोलत होत्या.

“सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जी वेळ दिली ती फार चुकीची आहे. अनेकांचे ऑफिसेस हे दहाला सुरू होतात. संध्याकाळी बंद होतात. त्यामुळे सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

रेल्वे सुरू होण्याने नोकरदारालाही याचा फायदा होणार नसल्याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. हळदीकुंकूला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. पाटील यांनी बचत गटांच्या नोंदणी केल्या असून या बचतगटांद्वारे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत पाटील आमदार झाले तर आनंद होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.