महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश असतोच यावरून आजच्या सामना अग्रलेखातून राज्यापालांवर टीका करण्यात आली आहे.
भाजप कडून राज्य सरकारवर खडसावून टीका केली, राज्यपालांना विमान नाकारणे हा इतिहातील काळा दिवस असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून भाजपल प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही. हे संकेत महाराष्ट्रात पायदळी तुडवले जाणे हाच काळा दिवस मानायला हवा. काळा दिवस पाळून निषेध करावा अशा अनेक घटना महाराष्ट्रात व देशात घडल्या असताना महाराष्ट्रातील भाजप चूप बसला. असा आरोप शिवसेनेन केला आहे.
अर्णब गोस्वामीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढले तरी हे त्या देशद्रोह्याच्या बाजूने उभे राहिले. भाजपच्या अधःपतनाचा शेवटचा अंक अशा पद्धतीने सुरू झाला आहे व त्या नाट्यात त्यांनी राज्यपालांना खलनायकाची भूमिका दिली आहे.’ असा आरोप शिवसेनेन केला आहे.