दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.
जी स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या मुंब्य्राच्या खाडीत सापडला आहे. मनसुख यांचा मृत्यू संशयास्पद, तितकाच रहस्यमय आहे’ असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.
फडणवीसांनी जाहीर केलेली माहिती म्हणजे अधिकृत तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष नाही, पण मनसुख प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होईल व सरकारला उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही’ असंही शिवसेनेने म्हंटल.
मनसुख मृत्यूप्रकरणी पास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.