बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. अक्षय कुमारचे वर्षाला 4-5 सिनेमा वर्षाला रिलीज होतात. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट केवळ 2021 मध्येच नव्हे तर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांत अक्षय कुमारने आपल्या मानधनात पुन्हा एकदा बरीच वाढ केली आहे.
अक्षय कुमारचे मानधन 99 कोटी वरुन 108 कोटीवर गेले होते, त्यांनतर त्याने 117 कोटीं मानधन केले होते. प्रत्येक बिग बजेट चित्रपटामध्ये निर्मात्याला अक्षय कुमारला आपल्या सिनेमात घ्यायचे असते. अक्षय कुमारने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाची फी वाढवून 135 कोटी रुपये केली आहे.
अक्षय कुमारने अलीकडेच ‘लक्ष्मी’ सिनेमामध्ये काम केले. दिवाळीदरम्यान तो रिलीज झाला आहे. त्याचा पुढचा सिनेमा ‘सूर्यवंशी’ रिलीजसाठी तयार आहे. अक्षयने ‘बेल बॉटम’चे शूटिंग पूर्ण केले असून सध्या अक्षय ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘मिशन सिंह’, ‘रक्षाबंधन’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम करणार आहे.