कोरोना निर्बंधाची अंमलबजावणी राहिली कागदावरच

9

पुणे जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी कोरोना निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लग्नात 50 व्यक्तींची उपस्थिती, हॉटेल, रेस्टॉरंट निम्म्या क्षमतेने सुरू, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी तसेच हॉटेल रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर शुक्रवारी जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतात. यावेळी ते करोना स्थिती नियंत्रणासाठी उपाययोजना सूचवतात. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देतात.

प्रत्यक्षात या आदेशानुसार नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निर्बंधाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. कोरोना निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते. मात्र, ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.