राजधानी दिल्ली स्फोटाचं इराण कनेक्शन समोर येत आहे. दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी संबंधित एक लिफाफा सापडला आहे. आणि यातून जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये स्फोटाचं इराण कनेक्शन तर नाही असा संशय आला आहे. या लिफाफ्यात हा स्फोट म्हणजे ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून बदल्याची भाषा करण्यात आली आहे.
टार्गेट जरी इस्त्रायली दूतावास असला तरी स्फोट भारतात घडलाय तेही दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत त्यामुळे त्याचं महत्त्वही मोठं आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठितून स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळाले. याप्रकरणी पोलिसांकडून सर्व इऱाणी नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान पोलिसांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्हीही तपासण्यात आले आहेत. स्फोटानंतर दोन संशयित कॅबमधून उतरून संशयास्पद रित्या फिरताना दिसत आहेत. याप्रकऱणी कॅब चालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. लिफाफ्यातून समोर आलेल्या माहितीनंतर, या घटनेमागे इराण कनेक्शन असल्याची शंका वाटत आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्रायलच्या एका कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातही इराणचेच दोन लोक सहभागी होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते. विशेष म्हणजे हे लोक दिल्ली येथील पहाडगंज हॉटेलमध्ये थांबले होते. गुप्तचर संस्थां अद्यापही त्यांच्या शोधात आहेत.