“मला वनमंत्री करा” या नेत्याने लिहीले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

38

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणी नाव पुढे आलेले शिवसेनेचे आ. संजय राठोड यांना राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे आता वनमंत्री पद कुणाकडे जाणार याकडे महाविकासआघाडीतील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच वनमंत्रीपदासाठी लॉबींगसुद्धा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमिवरच बंजारा समाजाचे नेते हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत वनमंत्री पदी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

हरीभाऊ राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. “तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी माझी आमदारकी पणाला लावली होती. शिवसेनेला बंजारा समाजाची आवश्यकता आहे. तसेच माझा प्रत्येक जिल्ह्यात संपर्क आहे. त्यामुळे मला मंत्रीपद दिल्यास शिवसेनेला नक्कीच फायदा होईल. परिणामी संजय राठोड यांचेऐवजी मलाच वनमंत्री करावे.” असे आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कॉंग्रेसच्या कोट्यसतून मला सहज मंत्रीपद मिळाले असते. मी विनाशर्त शिवसेनेते आलो होतो, तेव्हा सत्तेत अाल्यास खारीचा वाटा देऊ असे वचन आपण दिले होते.” असेसुद्धा त्यांनी यावेळी पत्रात म्हटले आहे.

वनमंत्रीपदासाठी महाविकासआघाडीत चढाअोढीस सुरुवात झाली आहे. विदर्भातून संजय राममुलकर, गोपीकिशन बाजोरीया यांचे नाव समोर येत आहे. ठाणे-मुंबई परिसरातील आमदारसुद्धा वनमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्नांत आहेत. परंतू मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र वायकर यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्री स्वत:कडेच हे पद राहु देणार आहेत.