बीड जिल्ह्यातील कडा तालुक्यातील वघदरा गावातील १० वर्षीय स्वराज सुनील भापकर याला त्याच्या आजी आजोब समोर बिबट्याने शेतातून उचलून नेले.हा मुलगा आपल्या आजी आजोबा सोबत शुक्रवारी १२.३० च्या सुमारास शेतात गेला होता पण शेतात बिबट्या लपलेला होता. त्याने आजी आजोबा समोरच मुलाला उचलून नेले.
आजी-आजोबांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा मृतदेह झाडाझुडपात पडलेला आढळून आला. तालुक्यात चार दिवसात बिबट्याने दुसरा बळी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.