महाविकास आघाडी सरकार पडणारच, हे आठवीतला मुलगाही सांगू शकेल : चंद्रकांत पाटील

22

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंढरपूरात आले होते.या वेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केले. 

आमदारांच्या विकासनिधीतील चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआयकडून होत असलेल्या चौकशीवरही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही, असेही ते म्हणाले. 

राज्यातील महाविकास आघाडील सरकार पडणार असल्याचे भाकीत केले. सरकार पडणारच, हे आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असे ते म्हणाले.