गुजरातमधील बहूचर्चित गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपीस तब्बल १९ वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा स्थानकावत साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लावून देण्यात आली होती. यामध्ये ५९ जणांचा मृत्यु झाला होता. १९ वर्षांअगोदर घडलेल्या या हिंसाचारातील मुख्य आरोपी असणारा रफीक हुसैन भटुक यांस पंचमहल पोलिसांनी गोध्रा येथुन अटक केली आहे.
रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवक साबरमती एक्सप्रेसने परतत होते. यादरम्यान गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेसवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. आणि त्यानंतर गाडीच्या एका डभ्यास आग लावण्यात आली होती. गोध्रा हत्याकांडानंतर संपूर्ण देशातील वातावरण तणावाचे झाले होते. दगडफेक आणि आग लावण्यात रफीक भटुक याचा सक्रीय सहभाग असल्याचे पंचमहल पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे.
पंचमहल जिल्हा पोलिस अधिक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रफीक हुसैन भटुक हा त्याकाळात स्थानकाच्या परिसरातच राहत होता. त्यावेळीतो स्थानकावर कामगार होता. तेव्हा ऊसळलेल्या हिंसेत रफीकचा सक्रीय सहभाग होता. भटुक आणि त्यांच्या साथीदारांनी रेल्वेच्या एका डब्यावर पेट्रोल टाकले होते आणि त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तो डबा पेटवला होता. गेल्या १९ वर्षांपासून रफीक फरार आहे. अाम्ही त्याच्या शोधातच होतो. एका गुप्त सुचनेनुसार तो गोध्रातील त्याच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता आला असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर सापळा रचुन आम्ही भटुक यांस अटक केली आहे.
रफीक भटुक गोध्रा हत्याकांडानंतर फरार झाला होता. सुत्रांच्या माहितीनुसार तो दिल्लीत काहीकाळ वास्तव्यास असल्याचे कळते. भटुकवर दंगल पसरविणे, हत्या करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.