जागतिक कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील प्रशासन हवालदिल झाल आहे. पुण्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने खबरदारी घ्यायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. आवश्यक त्या पूर्वतयारी करण्यावर पुणे महानरपालिकेच्या प्रशासनाने भर दिला आहे.
पुणे शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये आताच बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये साधारण ५ हजार ८ बेड असून, त्यापैकी फक्त ४९० बेड्स शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश काल काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील.