भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या विद्यालयाच्या बांधकामासाठी काही कालावधी जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज ३०० खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. कमला नेहरू रुग्णालयात ४०० खाटांची सुविधा आहे. त्यामुळे हे विद्यालय कमला नेहरू रुग्णालयाशी संलग्न केले जाणार आहे.
कमला नेहरू रुग्णालयात सध्या ६ ते ७ ओपीडी सुरू आहेत. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाकरिता १६ ओपीडी सुरू करण्यात येणार आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय आवारात उभारण्यात येणार आहे.
कमल नेहरू रुग्णालय सध्या प्रसूती आणि सबंधित उपचारासाठी वापरले जात आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय आयसीयु ,सुसज्ज रक्तपेढी, वोर्ड उभारले जाणार आहेत.