बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत त्याचा आगामी सिनेमा सत्यमेव जयते 2 च्या रिलीज डेटची घोषणाही केली आहे. यासंदर्भात त्याने सोशलवर पोस्ट शेअर केली आहे. हा सिनेमा 2021 च्या ईदला रिलीज होणार आहे अशी माहिती मिळत आहे. जॉनने ट्विटरवर ट्विट करत ही घोषणा केली आहे. जॉनने ट्विटरवर त्याचा हातात तिरंगा घेतल्याचा फोटो शेअर केला आहे.
यात तो तिरंगा हातात घेऊन पोज देताना दिसत आहे. या त्याचा देशी लुक पहायला मिळत आहे. मिशा, पगडी असा त्याचा लुक लक्ष वेधत आहे. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मिलाप झावेरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हा फोटो शेअर करत त्याने ट्विटमध्ये लिहिलयं की, तन-मन-धन यांच्यापेक्षा महान जन-गण-मन आहे. ‘सत्यमेव जयते २’ या आमच्या टीमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. या वर्षीच्या ईदला अर्थात १४ मे २०२१ ला भेटूयात सिनेमागृहात..! अशा शब्दांमध्ये त्याने हे ट्विट केले आहे.
जॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तो पागलपंती या मल्टीस्टारर सिनेमात दिसला होता. आता तो मुंबई सागा या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तो ‘सत्यमेव जयते 2’ आणि ‘अटॅक’ या सिनेमातही काम करत आहे.