शेतकर्‍य‍ांना भेटण्याकरिता गेलेल्या “त्या” खासदारांना गाझीपूर सिमेवरच अडवले

7

शेतकरी आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. विरोधक यावरुन वारंवार सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्त करत आहे. विरोधी पक्षातील नेते दिल्ली सिमेवर जाऊन शेतकर्‍यांची भेट घेत आहे. अशांतच काही खासदार शेतकर्‍यांच्या भेटीसाठी जात असतांना त्यांना गाझीपूर सिमेवर पोलिसांकडून अडवण्यात आले आहे. या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, अकाली दल खासदार हरसिमरत कौर बादल यांचा समावेश आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.

अनेकदा विनंती करुनसुद्धा या खासदारांना शेतकर्‍यांना भेटण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांची भेट न घेताच या खासदारांना माघारी परतावे लागले आहे. शिरोमणी अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका करत संताप व्यक्त केला आहे.

‘आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदारांनाही शेतकऱ्यांना भेटू दिलं जातं नाहीये.लोकशाहीसाठी हा एक काळा दिवस आहे’ असे ट्विट करत हरसिमरत कौर यांनी या घटनेचा निशेध नोंदवला आहे.

शिरोमणई अकाली दल , द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससहीत इतर पक्षांचे १५ खासदार गाझीपूर सीमेवर दाखल झाले होते. आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी हे खासदार जात होते. परंतु, या खासदारांना आंदोलन स्थळावर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली, असं हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षांचे खासदार तिरुचि शिवा, सौगत राय यांचादेखील या खासदारांत समावेश आहे. नॅशनल कॉन्फरन्स, क्रांतिकारी सोशलिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे.