बहुचर्चित रेमडेसिविर इंजेक्शन झालं स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर

58

कोरोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेले रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमतीत मोठी घट करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर रेमडेसिविर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाची किंमत घटवली आहे. त्यामुळे याचा लाखो रुग्णांना फायदा होईल.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नव्या किमतिसह सरकारचे दर परिपत्रक ट्विट केलं आहे. सध्या ७ कंपन्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे बाजारात रेमडेसिविर ब्लॅक मध्ये विकलं जात असल्याची माहिती आहे.

कंपन्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या किंमती कमी कराव्यात असे आवाहन केंद्रांनी कंपन्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत कंपन्यांनी आपले दर घटवले आहेत.

१०० एमजी इंजेक्शनची किंमत
कंपनी जुने दर/नवे दर
कॅडीला २,८००/८९९
सिंजिन ३,९५०/२,४५०
डॉ. रेड्डीज ५,४००/२७००
सिप्ला ४,०००/३,०००
मायलन ४,८००/३,४००
ज्युबिलंट ४,७००/३,४००
हेटेरो ५,४००/३,४९०