‘हा’ राष्ट्रवादीचा नेता म्हणतोय माझा धनंजय मुंडेंवर विश्वास

476

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कालपासून मुंडे यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. हे वृत्तसमोर येतात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे उपस्थित होते. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंडेंवरील आरोपांवर उत्तरं दिली. ‘धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास आहे’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.