राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक आणि जाहीर सभा घेतली. पक्षाचे नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी लवकरच पक्षातर्फे एक अधिकृत मोबाईल ॲप तयार करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी केली.
सोबतच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलन करतात, विविध विविध सामाजिक कामे करतात याची नोंद पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर घेण्याची व्यवस्था केली जात असल्याचेही ते म्हणाले.
तसेच या दौऱ्याची माहिती देताना ते म्हणाले की, “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. अनेक ठिकाणी आपले आमदार नाहीत. पण मित्र पक्षांचे आमदार आहेत. अशा भागात भेट देऊन तिथल्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा काढला आहे.”
यावेळी गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचामभाऊ भिसे, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, माजी आमदार राजू जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.